नागपूर, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशान्वये जिल्हा परिषद व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 42 पारधी बेड्यामध्ये वास्तव्य करणा-या पारधी समाज बांधवांची दवाखाना आपल्या दारी चमू मार्फत आरोग्य तपासणी आज दि. 27 जानेवारी पासून सुरू झाली आहे. ही तपासणी 29 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
तरी आरोग्य पथकामार्फत पारधी बेड्यामध्ये राहणा-या पारधी समाज बांधवांनी आपली आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे व या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी
नितीन इसोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी केले आहे