Published On : Fri, Mar 26th, 2021

शेतकरी विरोधी कायदे रद्द होत नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही– सुनील केदार

Advertisement

सावनेर व कळमेश्वर येथे चक्काजाम


मागील कित्येक महिन्यांपासून आपल्या हक्काच्या मागणिकरिता देशातील शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करीत आहे. या आंदोलना दरम्यान आज जवळपास ३०० शेतकरी हे मृत्युमुखी पडले आहे. परंतु तरीही अजूनपर्यंत केंद्रातील भाजपा शासनाला जाग आलेला नाही. परंतु देशातील शेतकरी अजूनही आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी दटून आहे.

या सर्व शेतकऱ्यांना समर्थन देणेकरिता व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमेटी तर्फे आयोजित भारत बंद कार्यक्रम संपूर्ण देशात आयोजित केला गेला असता सावनेर- कळमेश्वर विधानसभेत सावनेर शहर व कळमेश्वर शहर येथे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी केंद्रातील शासनाला खडे बोल सुनावले. एकीकडे संपूर्ण शेतकरी वर्ग आपल्या हक्काच्या मागणिकरिता आंदोलन करीत आपल्या प्राणांची आहुती देत आहे दुसरी कडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या शेतकऱ्यांना साधे सांत्वन देणे तर दूरच पण एक शब्द ही त्या शेतकऱ्यांबद्दल काढत नाही आहे उलट पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे हालचाल विचारण्यात मात्र धन्यता मानत आहे. देशातील पोशिंदा शेतकरी मरणासन्न अवस्थेत, विचारपूस मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांची परंतु देशातील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार असा खडा सवाल मंत्री सुनील केदार यांनी पंतप्रधानांना या चक्काजाम आंदोलनातून केला.

जो पर्यंत सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, केंद्राने केलेले काळे कायदे रद्द होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे सुनील केदार यांनी वक्तव्य केले. सामान्य नागरिकांनि सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावे व सोयीस्कर होईन त्या प्रकारे केंद्र सरकारचा निषेध करावा.

या आंदोलनात प्रमुख रूपाने महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे, नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे, आशाताई शिंदे, वैभव घोंगे व मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.