Published On : Fri, Mar 26th, 2021

शेतकऱ्यांच्या आजच्या भारत बंद ला कांग्रेस चा जाहीर सक्रिय पाठींबा,

Advertisement

कांग्रेस चे एक दिवसीय उपोषण आंदोलन


कामठी :-केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज 26 मार्च ला चार महिने पूर्ण झाले असून या आंदोलनातून केंद्र सरकारने लागू केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करीत आहेत.एकीकडे मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत.

या महागाईने सामान्य माणसाचे जगणे कठीण तर झालेच आहे परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचे सुद्धा कंबरडे मोडले आहे.देशात अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली असूनही केंद्र सरकार कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे तेव्हा या कुंभकर्णी झोपेत असलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी आज26 मार्च ला शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला कांग्रेस ने पाठींबा दर्शविला असून या पाश्वरभूमीवर कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशांनव्ये आज कामठी शहरात गांधी भवन प्रांगणात एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले.

Gold Rate
31 July 2025
Gold 24 KT 98,600 /-
Gold 22 KT 91,700 /-
Silver/Kg ₹ - ₹1,12,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या एक दिवसीय भूक हडताल आंदोलनाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमितीचेर महासचिव व माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सामूहिक माल्यार्पण करून अभिवादन वाहून करण्यात आला.

या एक दिवसीय भूक हडताल आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले असून या आंदोलनात कांग्रेस चे कामठी शहर अध्यक्ष कृष्णा यादव, कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव राजकुमार गेडाम, कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष अंकुश बावनकुळे, माजी नगराध्यक्ष प्रमोद मांनवटकर, माजी नगराध्यक्ष नीरज यादव, कांग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष किशोर धांडे, कांग्रेस सेवादल शहर अध्यक्ष मो सुलतान, राजा बारसिंगे, राशीद भाई, फैझल नागांनी, सलाम अन्सारी , संदीप जैन, शाहिद अंजुम अब्दुल, सुरेय्या बानो, विद्या बापैय्या, अंबिका रामटेके,नगरसेविका ममता कांबळे, विनोद वाईलकर,सुरेश अढाऊ, पप्पु चिमनकर, लक्ष्मण संगेवार, प्रमोद खोब्रागडे, माजी नगरसेवक सुलेमान अब्बास आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement