Published On : Sun, Jul 4th, 2021

हसनबाग मेन रोड मधील सीवर लाइन दुरुस्त करा – आप

नागपुर – आज नेहरू नगर झोन उपयुक्त यांना सीवर लाइन बाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन नागपुर शहर सचिव भूषण ढाकूलकर यांच्या मार्गदर्शना खाली व *आबिद खान* यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

हे निवेदन देत असतांना प्रमुख्यनी आरिफ भाई, अजीज खान रियाज भाई व अब्दुल कादर उपस्तित होते. मागील कही दिवसान पासून शाहुल हसन शाह मदरसा हसनबाग मेन रोड, हसंबाग या रस्त्यावरील सीवर लाइन चे टाकी (चैम्बर) खसली आहेत. या मुळे येथील सीवर लाइन वारंवार जाम होत आस्ते. लोकांना यामुळे त्रास होत आहे, रस्त्यावर घाण पाणी देखील जमा होते, रोगराई च्या संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.

प्रशासनाची उदासीनता असल्या मुळे, हि परिस्तित बऱ्याच काळा पासून निर्माण झालेली आहे. या आधी बऱ्याच वेळा लोकांनी प्रशासना कड़े तक्रार केली. पण प्रत्येक वेळी पैसा नही सांगणे, नंतर करूया असे कहीना कही करणे सांगून काम टाळन्यात येत आहे. येणाऱ्या १० दिवसात वरील नोंदलेले काम न झाल्यास आम आदमी पार्टी आंदोलन करणार.

या आंदोलनात नजीर खान, रियाज भाई, शकील भाई, वकील भाई, जमील भाई, शौकत भाई, मुस्ताक भाई, उस्मान भाई, राजू भाई, बाबा भाई, बबलू भाई, मुन्ना भाई, इस्माईल भाई, बशीर भाई, अरशद भाई, शफी भाई, मोइन भाई, गुड्डू भाई व अन्य कार्यकर्ते उपस्तित होते.