Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 31st, 2019

  हरदास घाट स्मारकाची दुरावस्था, स्मारकाच्या छताला आली गळती

  कामठी :- बिडी मजदूरांचे हृदय सम्राट ऍड ना.ह.कुंभारे उपाख्य दादासाहेब कुंभारे यांचा बिडी मजदूरांच्या सर्वांगीण विकासासाठी लढा देत असताना 14 ऑक्टोबर 1982 ला गोंदिया शहरास सकाळी 6 वाजता जात असताना वाटेतच त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते तसेच कन्हान नदिच्या पैलतिरी विद्रोहाचे पाणी पेटवणारे जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन.

  यांचा १२जानेवारी१९३९साली वयाच्या ३५व्या वर्षी निधन झाले. या दोन्ही मान्यवरांचा दफनविधी कन्हान नदिच्या पैलतिरी आर्मी सेक्टर च्या जागेवर करण्यात आला होता… उपरोक्त जागेवर १५जानेवारी१९४०पासुन हरदास स्मृती स्मारक.स्मृतीभुमी हरदास घाट कन्हान नदिच्या तिरावर हरदास मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो तर आंबेडकर चळवळीला ऐतिहासिक व प्रेरक असनाऱ्या या अभिवादनीय समूर्तीस्थळावर असलेल्या स्मारकाचे छत जिर्ण झाले असुन .. हळूहळू कोसळत आहे, ज्याकडे संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

  या अभिवादनिय हरदास घाट स्मारक ची असलेली दुरावस्था येथील आंबेडकरी चळवळीतील नेते., कार्यकर्ते आणी अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत तेव्हा आंबेडकरी अनुयायांची प्रेरक शक्ती स्थळांची होत असणारी अनास्था थांबविण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याची भूमिका घेणे गरजेचे आहे …

  जयभीम नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल एन तसेच बिडी मजदूरांचे हृदय सम्राट ऍड ना ह कुंभारे यांनी कामठी शहरात राहून केलेल्या क्रांतितून आपले नाव अजरामर करीत सर्वांचा शेवटचा निरोप घेतला असला तरी या मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 15 जानेवारी ला या हरदास घाटावर हरदास मेळाव्याच्या माध्यमातून अनुयायी वर्ग मोठ्या संख्येत या दोन्ही मान्यवरांच्या समूर्तीस्थळी अभिवादन वाहतात या मेळाव्याला जवळपास 79 वर्षे लोटत आहेत मात्र अजूनही या परिसराचे पाहिजे तसे सौंदर्यीकरण करण्यात आले नसून उलट या स्मारकाची दुरवस्था होत असून छताला गळती होत आहे परिणामी हे छत कोसळून या स्मारकाचे होणारे नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा संबंधित प्रशासनाने या हरदास घाट स्मारकाच्या दुरावस्थेची स्थिती लक्षात घेत सुव्यवस्थेकडे लक्ष पुरवावे अशी मागणी येथील आंबेडकरी अनुयायी वर्ग करोत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145