Published On : Thu, Jun 18th, 2020

विद्युत बिलाने सामान्य व गोरगरीब नागरिक हैराण

हाताला नाही काम आणि कुठून भरावे बिल,विजबिलात महावितरणने सवलत देण्याची गरज, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वेळीच दखल घेण्याची गरज,अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

रामटेक – शासनाने पाठविलेल्या भरमसाट विद्युत बील संबंधित जनतेत आर्थिक संकटाच डोंगर कोसळलेले आहे. जनतेचा या विदुयत बिलामुळे फार मोठा मनस्ताप झाला आहे. आता या महामारीच्या दिवसात येवढं बील भरण शक्यच नाही. आधीच लोकांचा सर्व प्रकारचा व्यवसाय हा ठप्प झाला आहे. आणि यात शासनाने तीन महिन्याचे एकत्र बील पाठविला आहे. आणि त्यात महत्त्वाचे म्हणजे त्यात शासनाने जो जास्तीचा वहन आकार लावला आहे तो कोणत्या आकाराने लावला आहे.. आणि जर दर वाढविला आहे तर तो याच दिवसात.. आणि कोणत्या दराने.. हा जनतेवर सरासर अन्याय आहे. आता या दिवसात आम्ही सरकारला सहकार्य केलं.. तर त्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे… आधीच जनता कोरोनाकालीन लॉकडाऊनमुळे त्रस्त आहे.

आता तर सरासरी कुटूंबाच पोट भरणे आवघड झाले आहे. यात तर सरकारतर्फे दोन महिन्याचा बील माफ असावे. तरी आम्ही बील भरण्यास तयार असू. बरोबर जस आधी बील येत होत तस सरासरी तीन महिन्याचा बील याची तपासणी करून बरोबर बील पाठवावा. उदा. जस महिन्याचा ३०० रू. बील येत होता तसा ९०० रू. होते. आता तर जर उन्हाळ्याचा विचार केला असता.. प्रती महिना ५०० रू. पकडले आसता तीन महिन्याचा १५०० रू. होते.. तर यांनी ३००० रू. पाठविले आहे.. हे कोणत्या हिशोबाने… हे जनतेस कळवून द्यावे.

पुन्हा मीटर मधील रीडिंग तपासून प्रती युनिटच्या हिशोबाने… आम्हास बरोबर बील पाठवावे. जनतेच्या या समस्यांच लवकरात लवकर निवारण करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रुखमाबाई नांन्हे, निलज पाटील, वैशाली कामठे, प्रकाश खंडार, प्रीती वानखेडे, राजू कारामोरे, नारायण कारामोरे, राजू नगरे , प्रकाश चामट, वामन निरुडवार करत आहे… आणि यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे कार्याध्यक्ष राकेश मर्जिवे, उपाध्यक्ष अविनाश शेंडे , सचिव प्रशांत येड़के , कोषाध्यक्ष शेषराव बान्ते, प्रसिद्धी प्रमुख देवानंद