Published On : Wed, May 8th, 2019

हमलापुरी शाळेला ‘युनोस्को स्कूल’चा बहुमान

Advertisement

आंतरराष्ट्रीय परिषद व स्पर्धेत सहभागी होण्याची मिळणार संधी

रामटेक: शहर प्रतिनिधी – तालुक्यातील हमलापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युनेस्को स्कूल स्थापनेस मान्यता मिळाली आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनेस्को स्कूल क्लब एशियन पॅसिफिक फेडरेशन युनेस्को क्लब असोसिएशन इंडिया नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मान्यतेसाठी महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कृत शिक्षक सचिन चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय ऐक्याची भावना, आंतरराष्ट्रीय समस्यांची जाणीव होण्यास मदत होणार असून यातून ‘ग्लोबल सिटीझन’ घडविणे हे युनेस्को स्कूल क्लबचे प्रथम उद्दिष्ट आहे. रामटेक तालुक्यातील दुसरी जिल्हा परिषद हमलापुरी शाळेला आंतरराष्ट्रीय ‘युनोस्को स्कूल क्लब’ चा मानाचा बहुमान लाभला आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आदानप्रदान व अभ्यास दौरा उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय परिषद व विविध स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. परदेशात भारतीय संस्कृती,कला सादरीकरण व इतर देशांतील संस्कृती अनुभवण्याची संधी देखील या युनेस्को स्कूल क्लबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. रामटेक तालुक्यातील ही दुसरी जिल्हा परिषद शाळा ठरली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण भागातील शेतकरी गोरगरिब पाल्यांना या माध्यमातून मोठे दालन उपलब्ध होणार असल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरसिंग दमाहे(शाळा समिती अध्यक्ष),प्रमुख अतिथी राज्य पुरस्कृत शिक्षक सचिन चव्हाण,सरस्वती ठकरेले,ममता ठकरेले,ग्रामपंचायत सदस्य सुखदेव बंधाटे,जयपाल बंधाटे, अमृत दमाहे, रोशनी दमाहे आदी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापिका माधुरी जैस्वाल यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन संगिता चाके यांनी तर आभार प्रदर्शन चारूलता टेकाडे यांनी केले.यशस्वितेसाठी उपसरपंच अनिल बंधाटे,विलास ठकरेले आदींनी सहकार्य केले. यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने,शिक्षण विस्तार अधिकारी श्यामसुंदर कुंवारे, केंद्रप्रमुख सुरेश धुर्वे आदींनी अभिनंदन केले आहे .

Advertisement
Advertisement