नागपूर : शहरातील महाल परिसरातील कोठी रोड भागात उशिरा रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वर्चस्वाच्या वादातून ही फायरिंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकरा ते बारा वाजताच्या सुमारास तीन दुचाकींवरून सहा जण कोठी रोड परिसरात आले. त्यांनी दोन राऊंड गोळीबार करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणात तक्रारदार सौरभ यांनी रवि मोहतो आणि गंगा काकडे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अमली पदार्थ विक्री आणि बाळगण्याचे गुन्हे यापूर्वीही त्यांच्यावर दाखल आहेत. आरोपींमधील अंतर्गत वादातूनच हा गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
घटनेनंतर महाल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोतवाली पोलिस पुढील तपास करत आहेत
अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...
गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...
मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...
शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews
नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC...
महंगाई की मार! धुले में शिवभोजन केंद्र चलाना मुश्किल #ShivBhojan #MaharashtraNews #Mehangai...






