Published On : Wed, Oct 25th, 2017

गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात, 9 आणि 14 डिसेंबरला होणार मतदान तर 18 डिसेंबरला निकाल

Advertisement

Rahul Gandhi and PM Modi

नवी दिल्ली: बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबर तर दुस-या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होईल. 18 डिसेंबरला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी तर, दुस-या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 93 जागांसाठी मतदान होईल.

गुजरातमध्ये एकूण 4 कोटी 33 लाख मतदार असून मतदानासाठी 50,128 मतदान केंद्रे उभारण्यात येतील. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना पहिले प्राधान्य मिळेल असे निवडणूक आयुक्त अचलकुमार जोती यांनी सांगितले. गुजरातमध्ये आदर्श अंचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. मतदानानंतर मतदाराला फ्लॅश लाईट दाखवणार तसेच उमेदवाराची सर्व माहिती सुद्धा दाखवली जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुप्तता राखण्यासाठी मतदानाच्या जागेची उंची वाढवणार येणार असून, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध असतील. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. कुठलाही उमेदवार 28 लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च करता येणार नाही. निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल असे अचलकुमार जोती यांनी सांगितले. पेड न्यूजच्या प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. 102 मतदान केंद्रांवर महिला नियुक्त केल्या जातील.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement