Published On : Fri, Jul 26th, 2019

पालकमंत्र्यांचा जनतेशी भेट कार्यक्रम रविवारी रविभवनात

नागपूर: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनतेशी भेट कार्यक्रम येत्या रविवार दि. 28 जुलै रोजी सकाळी 9 वाजता रविभवन काँटेज क्रमांक 5 येथे होणार आहे.

रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पालकमंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध राहतील.

पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदने मोबाईल नंबरसह लेखी आणावीत असे आवाहन पालकमंत्री कार्यालयाने केले आहे.