Published On : Sun, Sep 26th, 2021

पालकमंत्र्यांचा ई-मेल आयडी केवळ नावापुरता

– राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांचे स्पष्ट मत,कोराडी वीज केंद्रासंदर्भात दिलेली निवेदने थंड बसत्यात


नागपुर – महाविकास आघाडी सरकारमधील विद्यमान ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत महोदयांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकोपयोगी समस्यांविषयी ई-मेल द्वारे तक्रारी केल्या जातात मात्र त्यांच्याकडूनच काहीच प्रतिसाद येत नसल्याने ऐक्याची प्रक्रीया पुढे सरकत नाही,असे राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले.

मुंबई मंत्रालयात हालअपेष्टा सोसत ग्रामीण भागातून अनेक जण जात होते. ग्रामीण भागातील नागरिकांना मुंबईला अनावश्यक यावं लागू नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यात आले. या करीता संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांना कोणतीही मदत, काहीही लागेल तर त्यांना मुंबईऐवजी स्वतः च्या जिल्ह्यात न्यायकरिता सामान्यांना ठिकाण उपलब्ध झाले. आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेला प्रत्येक लहान-सहान कामासाठी मंत्रालयात येण्याची गरज भासणार नाही.

मुंबईपासून दूर राहणाऱ्या लोकांना आपल्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय प्रत्येक विभागात काम करेल. मुंबई आल्यानंतर मंत्रालयात नेमके कोणाला भेटायचे? मुख्यमंत्र्यांकडे समस्या कशा मांडायच्या? याबाबत ग्रामीण भागातील लोक गोंधळून जातात. लोकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी राज्याच्या प्रत्येक विभागात सीएमओ कार्यालय थाटण्यात आले आहे.

सरकार हे ना राजा असणे अपेक्षित, ना नुसते संचालक. सरकारने मालकही असू नये आणि पालकही असू नये. सरकारने विश्वस्त असावे. सरकारच्या बाबतीत हेच लागू होते.

महाविकास आघाडी सरकारात ऊर्जा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून प्रत्येक विभागातील अनागोंदी कारभारामुळे जनता व कामगार पुन्हा त्रस्त झालेली आहेे सरकारी काम आणि सहा महिने थांब आशी म्हण आहे पण मंत्रालयीन कार्यालयाकडे असलेले कामे सहा महिनेच काय अवघे वर्षभर थांबले तरी कामे जलद गतीने होईल अशी अपेक्षा करणे देखील अवघड होऊन बसले आहे महानिर्मिती मुंबई कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांची कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्यावर नसलेले वचक मुळे मुख्य अभियंता पासून कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत सुस्तावलेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्याद्वारे निर्माण झाल्याचा मुर्दाड व्यवस्थेला जागेवर आणण्यासाठी आपण लोक सेवक आहोत हुकूमशाह नाही आपली नियुक्ती लोकांच्या सेवेसाठी केलेली आहे याची जाणीव विद्यमान ऊर्जा मंत्री यांना करून देणे गरजेचे आहे.

नागपूर चे ऊर्जा मंत्री नितीन राऊत असतांना त्यांची भेट होण्याचा ठराविक दिवस कोणता याचा निश्चितच सुगावा लागणे कठीण आहे.त्यांच्या स्वीय सहायकांना मोबाईल वरून संपर्क केला असता ते प्रतिसाद देत नाहीत.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस चे सरकार असूनही महानिर्मिती कोराडी वीज केंद्रात कामे होत नाहीत, ही आमची वस्तुस्थिती आहे. साध्या कामगार समस्या, कंत्राटी कामगार भरती अन् प्रशासनाशी संबंधित अनेक निवेदने दिली पण जाणीवपूर्वक त्यावर कार्यवाहीसाठी दिरंगाई केली जाते तसेच लोकोपयोगी कामांमध्येही आम्हाला विश्वासात घेतले जात नाही,अशी कैफियत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मांडली.

मंत्री व त्यांची जवळीकता असणाऱ्यां लोकांची भूमिका स्वार्थी व स्वहिताची आहे. मुख्य अभियंता व कर्मचाऱ्यांशी त्यांचे हितसबंध तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांची महानिर्मिती कोराडी वीज केंद्राच्या कार्यालयात एक प्रकारे एकाधिकारशाही निर्माण झाली आहे.त्यातून ते वजन वापरून आपल्या मर्जीतील लोकांचा कंत्राटी कामगार म्हणून भरणा करतात. ही प्रथा थांबली पाहिजे.

– भुषण चंद्रशेखर
जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा (ग्रा)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

८०% भूमिपुत्रांनाच प्राधान्य हा कायदा कोराडी वीज केंद्रात तरी मंत्री व राजकारण्यांना लागू नाही, असे दिसते. म्हणजे तो फक्त सरकारी नोकऱ्य़ांपुरताच मर्यादित आहे.ही वस्तुस्थिती आहे.

– उषा रघुनाथ शाहू
अध्यक्ष, कामठी विधानसभा
राष्ट्रवादी महिला काँग्रेस