Published On : Sun, Sep 26th, 2021
By Nagpur Today Nagpur News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्स नागपूर देशात उत्तम रुग्णसेवेसाठी अग्रस्थानी ओळखले जाणार

– केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे एम्सच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिपादन, विदर्भातील गरजा लक्षात घेऊन एम्समधील सुविधांचा लाभ ग्रामीण भागात पोहोचाव्यात : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नागपुर: सुविधांनी युक्त असून येथे दिल्या जाणा-या उत्तम गुणवत्तेच्या आरोग्यसेवेसाठी हे संस्थान देशातील वैद्यकीय संस्थामध्ये अग्रस्थानी ओळखले जाणार, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले . नागपूरच्या मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्सच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते . याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुद्धा आभासी माध्यमांद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केले. वर्धापन दिनानिमित्त एम्सच्या सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. पी.के. दवे, एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता,राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे प्रामुख्याने उपस्थित होते .

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरमध्ये असणाऱ्या एम्सचा फायदा हा केवळ विदर्भातीलच नव्हे तर लगतच्या मध्य प्रदेश छत्तीसगड मधील राज्यातील रुग्णांना सुद्धा होत आहे . कोवीडच्या काळात एम्समधील डॉक्टर्स ,नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ यांनी रुग्णांना आरोग्य सेवा पुरवल्या . एम्समधील विद्यार्थी शिक्षक यांची संख्या तसेच अभ्यासक्रमाचे नवे विभाग यांची संख्यासुद्धा वाढायला पाहिजे . ह्रद्‌य, यकृत, फुप्फुस, किडनी, डोळे अशा अवयवांच्या प्रत्यारोपणाची सुविधा एम्समध्ये उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विदर्भातील गरजा लक्षात घेऊन एम्समधील सुविधांचा लाभ शहरासोबतच ग्रामीण भागात पोहोचण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. ‘प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन’ विषयी माहिती देतांना त्यांनी सांगितलं की ,या अभियानामुळे व्यक्तिगत स्वास्थ नोंदणी केली जाणार असून त्याचा फायदा ‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम’ ची यंत्रणा तयार करण्यासाठी होणार आहे .2014 पुर्वी देशात 6 एम्स होते आता केंद्र शासनाने प्रत्येक राज्यात एम्स उभारण्याचे धोरण स्वीकारल्या पासून देशभरात 22 एम्सचे बांधकाम चालू आहे, ही बाब गौरवास्पद असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उपचारासोबतच रुग्णांना सहानुभूती आणि मानसिक आधार मिळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं .

नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपण एम्स दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्तही उपस्थित होतो आता तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त एम्सने कोवीड काळात केलेल्या रुग्णसेवेमध्ये सुधारणा झाली असून एम्स नागपूर सर्व स्तरावर रुग्णसेवेचे उच्चांक गाठत असल्याचे मत मांडले.

तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ॲनाटोमी, फार्मॅकॉलॉजी तसेच इतर विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . एम्सच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील उपक्रमांवर आधारित ‘अभिज्ञान’ या पत्रिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांनी केले तर आभार प्रदर्शन अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक यांनी केले. या कार्यक्रमाला एम्सचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते,

Advertisement
Advertisement