Published On : Fri, Dec 21st, 2018

पंजाबी लाईन येथील ट्रंक लाईनसाठी निधी देणार : पालकमंत्री

मनपाच्या विविध विषयावर बैठक

नागपूर: शहरातील पंजाबी लाईन गड्डीगोदाम सदर भागातील ब्रिटिश कालीन ट्रंकलाईन आता जुनी झाली असून नवीन ट्रंकलाईनसाठी प्रस्ताव सादर करा. 1 कोटी 48 लाख रुपये नवीन ट्रंकलाईनसाठी लागणार असून खनिज निधीतून हा पैसा पंजाबीलाईनसाठी देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Advertisement

मनपा सभागृहात विविध विषयावर बैठकी आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी महापौर नंदा जिचकार, अति. आयुक्त ठाकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन नगर येथे मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आशीनगर झोनअंतर्गत विद्यार्थ्यांसाठ़ी बसच्या व्यवस्था करण्याप्रसंगी पालकमंत्र्यांनी मनपाला निर्देश दिले.

Advertisement

श्रमजीवी व समाजभूषण सोसायटीतील लेआऊटधारकांना पट्टेवाटप प्रकरणी या जमिनीची मोजणी करणे आवश्यक आहे. या जमिनीच्या मोजणीचे पैसे एनआयटी भरून मोजणी करून देण्याचा निर्णय झाला. मोजणी झाल्यानंतर पट्ट्यांबाबतची कारवाई लवकर होईल. गुरुनानक कॉलेज ते कामठी रोड पर्यंत रस्ता तयार झाला असून अर्धाच रस्ता तयार झाला. जयका मोटर्सचा भाग रस्त्यासाठी शासनाने रद्द केला. हा रस्त्या अन्यत्र कुठून वळवता येईल काय, याची तपासणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

इंदोरा भागातील शिवाजी कॉम्प्लेक्स परिसरातून भूमिगत नाली टाकण्याच्या प्रक़रणी ही जागा रेल्वे लाईनला लागून आहे. याशिवाय जागेवर झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे येथे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लाण्ट टाकणे आवश्यक आहे. पालकमंत्र्यांनी या कामासाठी मंजुरी दिली. झिंगाबाई टाकळी येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत 145 घरे उपलब्ध आहेत. यापैकी 95 णांना घरे वाटप करण्यात आली. उर्वरित घरे रिकामी आहेत. कारण नागरिक तेथे जाण्यास तयार नाही.

लिंक रोड सदर येथील मनपाच्या शॉपिंग काँम्प्लेक्स 40 वर्षे जुने आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे. मार्केट विभागाने या इमारतीतील दुकानदारांना काढण्यासाठ़ी नोटीस दिली आहे. पण गाळेधारक जायला तयार नाहीत. या प्रकरणी पालकमंत्री बावनकुळे यांनी गाळेधारकांना नव्याने इमारत बांधून जागा द्या, यासाठी त्यांच्या स्वाक्षर्‍या घ्या फ्रीफॅब तंत्रज्ञानाने ही इमारत बांधा म्हणजे बांधकाम लवकर होईल व गाळेधारकांना देता येईल, असे निर्देश दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement