Published On : Fri, May 1st, 2020

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर:- कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महा निरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, पोलीस अधिक्षक राकेश ओला व निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यावेळी उपस्थित होते.