नागपूर :- महाराष्ट्र दिनानिमीत्त आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातून वेब कॉन्फरन्सव्दारे लोकप्रतिनिधी तसेच कार्यरत अधिकाऱ्यांना कोरोनामुक्तीची शपथ दिली.
पालकमंत्र्यांनी सर्वाना प्रारंभी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व संघभावनेने काम करत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. कोरोनामुक्तीसाठी यावेळी त्यांनी सामुहिक शपथ दिली. यावेळी खासदारी डॉ. विलास महात्मे आमदार राजू पारवे, आशिष जयस्वाल, प्रकाश गजभीये, टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे आदींची उपस्थिती होती.
देशात, महाराष्ट्र राज्यात संक्रमित होत असलेल्या कोरोना या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व जात-पात, धर्म तसेच आपसी मतभेद विसरुन,आज 1 मे महाराष्ट्र दिनी आम्ही अशी शपथ घेतो की, आम्ही कोरोना या महामारीचा सर्व शक्तीनिशी एकजुटीने मुकाबला करू, देशवासियांची तन,मन,धनाने सर्वतोपरी मदत करून सर्वाची सेवा करु, अशा शब्दात शपथ देण्यात आली.
सर्व तळागाळातल्या देशबांधवाना मदत करणे हे आमचे कर्तव्य असुन त्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द राहू.सर्व तळागाळातल्या देशबांधवाना मदत करणे हे आमचे कर्तव्य असुन त्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द राहू.
आम्ही संकल्पपुर्वक अशीही शपथ घेतो की,आम्ही मास्क ,वैयक्तीक स्वच्छता आणि सोशल डीस्टन्सींगचे तंतोतंत पालन करून नागपूर जिल्हा कोरोनामुक्त करू.
विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर यावेळी उपस्थित होते.


