Published On : Tue, May 8th, 2018

महापालिकेची तक्रार निवारण यंत्रणा ‘गतिमंद’

Advertisement

NMC Nagpur

नागपूर: महापालिकेची तक्रार निवारण यंत्रणा मागील १ महिन्यापासून ठप्प झाल्याची तक्रार ‘नागपूर टुडे’ कडे आली होती. त्यानुसार अनेकदा प्रयत्न करूनही तक्रार निवारण यंत्रणा प्रतिसाद नव्हती. तसेच याप्रकरणी लेखी तक्रार नोंदवूनही मनपा प्रशासनाच्या टेक्निकल टीमकडून काहीही कारवाई करण्यात आली नाही.

यासंदर्भात मनपा तक्रार निवारण यंत्रणेचे तांत्रिक प्रभारी स्वप्नील लोखंडे यांच्याशी ‘नागपूर टुडे प्रतिनिधीने’ बातचीत केली असता त्यांनी सदर यंत्रणा ठप्प नसून केवळ गतिमंद झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला सदर यंत्रणेवर अजूनही नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. परंतु यंत्रणेच्या बिघाडासंबंधीची लेखी तक्रार देखील आपल्याकडे आली असल्याचे ते म्हणाले. तांत्रिक समस्येमुळे या तक्रार निवारण यंत्रणेची डेव्हलपर एजन्सी ‘मास टेलिकॉम प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेकडून यंत्रणा पूर्ववत करण्यास थोडा विलंब झाला, असे स्पष्टीकरण लोखंडे यांनी दिले.

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याचप्रमाणे कामाच्या तासांमध्ये आम्ही हे टेक्निकल अपग्रेडेशन करू शकत नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आम्ही मंगळवारी संध्याकाळी ७ वाजतानंतर सदर यंत्रणा अपग्रेड करून पूर्ववत सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

—Swapnil Bhogekar

Advertisement
Advertisement