Published On : Thu, Aug 29th, 2019

रेशीमबाग मैदानात मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

Advertisement

नागपूर : हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शहरातील रेशीमबाग मैदानात मनपाचे आरोग्य समिती उपसभापती व माजी क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या नेतृत्वात मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी आरोग्य समिती उपसभापती व माजी क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्यासह क्रिकेट प्रशिक्षक शिशीर सुदामे, एस.जे.ॲन्थोनी, ॲथलेटिक्स प्रशिक्षक रवींद्र टोंग, गुरूदेव नगरारे, मंगेश पौनीकर, आनंद सोमकुवर, धावपटू निकीता राउत, श्रीधर काका, निशांत डेहरीया, ललीत, एडवीन ॲन्थोनी, करण नायडू, क्रिस्टोफर क्रुस, राजू वर्मा, अन्थ्रेस लकरा, डोमा चाफले, मोहन पाटील यांच्यासह रेशीमबाग मैदानावर सराव करणारे क्रिकेट, फुटबॉल व ॲथलेटिक्स खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी सर्व मान्यवरांनी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

मेजर ध्यानचंद यांनी १९२८ ला ॲमस्टरडॅम, १९३२ला लॉस एंजलिस व १९३६ला बर्लिन असे तीनदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळविण्याचे किमया साधली. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगर संबोधले जाते. जर्मनीकडून खेळण्यासाठी हिटलरने दिलेली ऑफर धुडकावून आयुष्यभर देशासाठी खेळणा-या ध्यानचंद यांचा देशानेही सन्मान करण्याची आज गरज आहे. हिटलर हे देशाचे अनमोल रत्न आहेत, त्यांना भारतरत्न खिताबाने गौरविण्यात यावे, अशी मागणीही यावेळी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून केली.

Advertisement
Advertisement