Published On : Thu, Aug 29th, 2019

सर्व शासकीय योजनांची माहिती लोकप्रतिनिधींनी जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे : महापौर नंदा जिचकार

Advertisement

प्रभागामध्ये शिबिर आयोजित करण्याचा नगरसेवकांना सल्ला : कार्यशाळेत ६६ नगरसेवकांची उपस्थिती

नागपूर: नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतात. जनतेच्या समस्या प्रभावीपणे शासनापुढे मांडण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. शासनाद्वारे जनतेसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचिवण्याचे काम नगरसेवकांचे आहे आणि ते काम त्यांनी यशस्वीपणे करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Gold Rate
22 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,51,700/-
Gold 22 KT ₹ 1,41,100 /-
Silver/Kg ₹ 3,08,600 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती नगसेवकांमार्फत जनतेपर्यंत पोहचण्यात यावी, याउद्देशाने गुरूवारी (ता.२९) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत महाल येथील राजे रघूजी भोसले नेताजी नगर भवन येथे कार्यशाळेचे आयोजन कऱण्यात आले होते.

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, वैद्यकीय सेवा व आरोग्य व वैद्यकीय सेवा समिती उपसभापती नागेश सहारे, समिती सदस्य लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आरोग्य योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. महाराष्ट्र शासनाने आरोग्य विषयक योजनांचे एक कवच नागरिकांना दिले आहे. त्याची अंमलबजावणी नीट होणे गरजेचे आहे. या सर्व योजना सामन्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी हे उत्तम माध्यम आहे. नगरसेवकांचा लोकप्रतिनिधींशी संपर्क दांडगा असतो. नागरिकांना कोणतिही अडचण आली की, ते सर्वप्रथम नगरसेवकांशी संपर्क साधतात. अशावेळी नगरसेवकांना या योजनांविषयी माहिती असणे आवश्यक असते, असेही महापौर म्हणाल्या.

वाढते शहरीकरण व त्यामुळे आरोग्यावर होणा-या परिणामाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाची अंमलबजावणी मनपा आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. परंतू या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करुन नगरसेवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे यांनी शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य पोषण आहार दिन, महिला आरोग्य समिती, कुटूंब कल्याण या सर्व योजनांसह शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व मनपा दवाखान्यात उपलब्ध सेवांबाबतही माहिती त्यांनी उपस्थित नगरसेवकांना दिली.

मनपाचा हा पहिलाच उपक्रम असून नगरसेवकांसाठी योजनांची माहिती देणारी कार्यशाळा पहिल्यांदाच मनपामध्ये आयोजित करण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement