नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून प्रस्तावित प्रभाग ३५ मधील विविध १५ मैदानांच्या नूतनीकरण कामाचे गुरूवारी (ता.२९) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक संदीप गवई, संजय खोरगडे, आसावरी कोठीवान, संजय पौनीकर, बिट्टू चव्हाण, मनिष देहाडराय, रूपेश चावरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीमधून दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मैदानाच्या नूतनीकरणासाठी १५ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला. या निधीतून प्रभाग ३५ मधील सर्वाधिक १५ मैदानांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
प्रभाग ३५ मधील म्हाडा कॉलनी, स्वामी स्वरूपानंद, सप्तगौरी, फेन्ड्स, अमर संजय सोसायटी, सुरेश गृह निर्माण, दत्तात्रय सोसायटी, अभिनव गृहनिर्माण, पायल पल्लवी, जयहिंद सोसायटी, भारती गृहनिर्माण, आरटीओ सोसायटी, गुरूछाया सोसायटी, डिव्हीजनल को-ऑपरेटीव्ह सोसायटी या मैदानांचे नूतकरणीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरण कार्यांतर्गत मैदानांचे समतलीकरण, हायमस्टर विद्युत दिवे, चेंजिंग रूम यासह काही मैदानांना सुरक्षा भिंत तयार करण्याचे काम करण्यात येणार आहेत.