Published On : Wed, Oct 31st, 2018

सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना महावितरणचे अभिवादन

नागपूर: देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांच्या जयंती निमित्य आणि माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य महावितरण कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण)सुहास रंगारी यांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळीमुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, महा व्यवस्थापक (वित्त व लेखा)शरद दाहेदार, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, सहायक महा व्यवस्थापक(मानव संसाधन)वैभव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गास मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी राष्ट्रीय एकता आणि अखंडतेची शपथ दिली.