Published On : Wed, Oct 31st, 2018

गोंडेगाव ला महाराजस्व अभियान शिबीर संपन्न

कन्हान : – महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याकरिता तसेच सर्वसामान्य जनता यांचे महसुल विभागा अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्‍न सत्वर निकाली काढण्या साठी ” शासन आपल्या दारी” या धरतीवर महाराजस्व अभियानाचे गावपातळीवर लोकांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रदीपकुमार आडे यांच्या नेतृत्वात मंगळवार दि.३०़ऑक्टोबर २०१८ ला गोंडेगाव येथे एक दिवसीय महाराजस्व शिबीराचा लोकांनी भरपुर लाभ घेतला.

तहसिल कार्यालय पारशिवनी व्दारे ग्राम पंचायत गोंडेगाव येथे मा.जोगेंद्र कटयारे साहेब उपविभागीय अधिकारी रामटेक व तहसिलदार मा.वरूनकुमार सहारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मा. प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात महाराजस्व अभियान २०१८ दि.३० ऑक्टोबर २०१८ ला सकाळी ११ ते ५ वाजे पर्यंत राबविण्यात आले. यात गोंडेगाव ग्रामस्थाचे राशन कार्ड दुरुस्ती व नाव कमी करणे-८९ , नविन राशन कार्ड -१७ , नवीन आधार कार्ड – ६०, आधार कार्ड दुरुस्ती – २९ ,नवीन मतदार नोंदणी – ३५, उत्पन्नाचे दाखले -४७, रहिवासी प्रमाणपत्र – २५२, शपथपत्र – २७,वारसान प्रमाणपत्र -१०, पोलीस पाटील प्रमाणपत्र -०५, संगायो अर्ज २७, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान अन्तर्गत उपकेंद्र जुनिकामठी व्दारे ७० रूग्णाची तपासणी करून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना,आयुष्यमान भारत नोंदणी ,गोवर रूबेला लसीकरण मोहीम, कृषी विभागाने तुषार ठिंबक,कृषी यांत्रिकी करण अंतर्गत एच डी पी इ पाईप, किटकनाशके फवारणी करतांना घ्यायावयाची काळजी, मा.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना , मागेल त्याला शेततळे आदी विषयांवर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले .

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ग्राम पंचायत गोंडेगाव येथे महाराजस्व अभियान २०१८ या शिबिराचा गावातील मोठय़ा संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. या शिबीरांच्या यशस्वीते करिता नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे, सं गां यो विभाग – श्री आर बी लुटे , तलाठी – एन पी गिरडकर, पुरवठा अधिकारी कु. तितीशा बारापात्रे , मेहर , निवडणूक विभागचे एस डी सहारे , कृषी सहाय्यक अमित झोड, शालीक वडे , आरोग्य सेविका वालदे, आरोग्य सेवक सुरेंद्र गि-हे, निर्मला पवार, आशा वर्कर्स आम्रपाली पाटील, सेतु केंद्र प्रशांत कारोडे, आधार कार्ड उईके , सरपंच – नितेश राऊत, ग्रा.प.सदस्य सुभाष डोकरीमारे, सुनील कुमार धुरिया, आकाश कोडवते, मोरेश्वर शिंगणे , निर्मला सरवरे,पूजा राशेगावकर,यशोदा शेंदरे,ललिता पहाडे, रेखा काळे, सचिव – पालांदुरकर,कोतवाल- राजेश पाटील , ग्रा.प. कर्मचारी संजय मेश्राम, चन्द्रमणी चिचखेडे आणि गावक-यांनी सहकार्य केले .

Advertisement
Advertisement