Advertisement
नागपूर : नागपूरचे पहिले महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमहापौर मनीषा कोठे यांच्या हस्ते मनपा मुख्यालयासमोरील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, प्रमुख अग्निशामक अधिकारी राजेंद्र उचके, निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, राजू दुबे, अग्निशमन विभागाचे राजेंद्र दुबे, सुनील डोकरे, सुनील राऊत, केशव कोठे उपस्थित होते.