Published On : Wed, Sep 25th, 2019

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना अभिवादन

नागपूर : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नागपूर शहरच्या वतीने इंदोरा चौक येथील पुतळ्याला मोर्चाचे शहराध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी प्रदेश मोर्चा सचिव नेताजी गजभिये, मनीष मेश्राम, रिपाइंचे (आठवले) नेते बाळासाहेब घरडे, सुधीर नारनवरे, झोपडपट्टी मोर्चाचे शहराध्यक्ष रमेश वानखेडे, शंकरराव मेश्राम, रोहन चांदेकर, जगदीश बामनेट, महेश पाटील,दशरथ मडावी, मोरेश्वर हेडाऊ, विनोद कोटांगळे, अशोकराव डोंगरे, बबन बंसोड, संदेश खोब्रागडे, सुनील गणवीर, ओंकार अंबादे, बाळूमामा कोसरकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.