Advertisement
नागपूर – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवारी बेझनबाग येथील युवक काँग्रेसच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव असिफ शेख, सतीश पाली, फजलूर कुरेशी, उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष निलेश खोब्रागडे, गौतम अंबादे, चेतन तरारे, निशाद इंदूरकर, सचिन वासनिक, आकाश इंदूरकर, कुणाल निमगडे, दानिश अली, राकेश इखार, विलियम साखरे, सप्तऋषी लांजेवार व युवक काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कुणाल राऊत यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. संचालन सचिन वासनिक यांनी केले तर आभार सतीश पाली यांनी मानले.