नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी महानगरपालिका मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, लेखा विभागाचे उपसंचालक आमोद कुंभोजकर, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, अग्निशमन विभागाचे अधिकारी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस आदी उपस्थित होते.
