Published On : Sat, Feb 27th, 2021

शहीद चंद्रशेखर आझाद बलिदान दिवसानिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या ९० व्या बलिदान दिवसानिमित्त नागपूर नगरीच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी आणि उपमहापौर मनीषा धावडे यांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहीद चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून क्रांतिकारकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक मनोज चापले, संजय महाजन, भाजप मध्य नागपूरचे दशरथ मस्के, चंद्रशेखर आझाद दलाच्या पदाधिकाऱ्यांसह दर्शन पारधी, हेमराज पारधी, जोगेंद्र राठोड, रणवीर राठोड, हिरालाल शर्मा, विकास राठोड, नितीन राठोड, विवेक पारधी, शकुंतला ठाकूर, विनोद इंग़ोले आदी उपस्थित होते.