Published On : Tue, Jul 23rd, 2019

लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त्य जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचेकडून अभिवादन

नागपूर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त्य जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज लोमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

बचत भवन सभागृहात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, अविनाश कातडे, जिल्हापुरवठा अधिकारी भास्कर तायडे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प वाहून अभिवादन केले.