Published On : Tue, Jul 23rd, 2019

महाराष्ट्र शाहीर परिषदतर्फे कामठीत शाहीर मेळावा संपन्न

Advertisement

शाहीर कलाकारांनी व्यसनमुक्त व्हावे —- राजू बावनकुळे

कामठी : शाहीर कलाकार खरी मंडळी शासकीय लाभापासून वंचित राहतात तेव्हा या शाहिरांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव यांच्या सोबत आहे तसेच शाहीर कलाकारांनी व्यसनमुक्त व्हावे, कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , डॉ दीपक खिरवडकर हे मला नेहमी सहकार्य करतात असे उदगार नागपूर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद ,सदस्य वृद्ध कलावंत मानधन समिती नागपूर जिल्हा शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर बहादूला बराडे यांनी कलाकारांना शासकीय योजने बद्दल माहिती दिली, तसेच महाराष्ट्र शाहीर परिषद 50 वर्षा पासून शाहीरांच्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चे ,निवेदन देऊन कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे असे भारतीय कलगी शाहीर डहाकl मंडळ ,महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या समूर्ती प्रित्यर्थ जानकी मंगल कार्यालयात आयोजित गुरुपूजा आणि शाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार देवराव रडके, राधेश्याम हटवार,योगेश वाडीभस्मे, ,कवी ज्ञानेश्वर वांढरे,ज्येष्ठ शाहीर मधुकर बांते, शा
माणिकराव देशमुख, सुबोध कान्हेकर,मोरेश्वर मेश्राम, शंकर येवले,यादवराव कान्होलकर,पुरुषोत्तम खांडेकर,ज्ञानेश्वर मेश्राम,ताणबा शिंगारे,शा राजेंद्र येस्कर उपस्थित होते, यावेळी ज्येष्ठ शाहीर कलाकार आणि युवा कलाकार 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी शा ब्रह्ननवघरे,दशरथ भडंग,राजकुमार नागदेवे, भगवान लांजेवार,शंकर भडंग, राजेंद्र लक्सने,भुपेश बावनकुळे, जितेंद्र
अतकरे,अरुण मेश्राम, बाबाराव दुपारे, ईशाक भाई,चंद्रभागा खांडेकर,चरण कापसे,फागो इरपती,गिरीधर बावणे,महादेव पारसे आदींसह शेकडो शाहीर कलावंत उपस्थित होते,दरम्यान उपस्थित शाहिरांनी खडी गम्मत, गोंधळ, डहlकl, पोवाडे,भजन आदी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले,यावेळी संचालन भैयालाल माकडे,प्रास्ताविक आणि आभार कवी ज्ञानेश्वर वांढरे यांनी केले.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement