Published On : Sat, Jun 26th, 2021

छत्रपती शाहू महाराज यांना मनपातर्फे अभिवादन

नागपूर : आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते समाज सुधारक छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या प्रतिमेलाला माल्यार्पण करून अभिवादन केले.

हा दिवस राज्यभरात सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो. छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने बहुजनांच्या हक्कासाठी लढले. रयतेचा राजा म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. अशा थोर राजास आम्ही विनम्र अभिवादन करतो, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.

यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व राजेश वासनिक उपस्थित होते.