Published On : Sat, Jun 26th, 2021

वर्धा रोडवर मार्ग मोकळा करण्यासाठी सुरक्षा भिंती तोडण्याचे काम सुरु

Advertisement

नागपूर : वर्धा रोडवरील डबल डेकर पुलालगत साई मंदिर ते अजनी मेट्रो स्टेशन मार्ग रुंद करुन वाहतुकीस मोकळा करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या घराच्या सुरक्षा भिंती तोडण्यास शुक्रवारी सुरुवात झाली.

नागपूर महानगरपालिका आणि महामेट्रो मिळून सुरक्षा भिंती तोडण्याचे काम सुरु केले. उड्डाण पुलाच्या खालचा रस्ता रुंद करून वाहन चालकांना होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Gold Rate
28 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,64,400/-
Gold 22 KT ₹ 1,52,900 /-
Silver/Kg ₹ 3,72,000 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग) अभय पोहेकर, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, स्थावर अधिकारी राजेन्द्र अंबारे यांच्यासोबत या मार्गाची पाहणी करुन सुरक्षा भिंती तोडण्याचे निर्देश दिले होते. या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या ३४ घर मालकांना नुकसान भरपाईची रक्कम देऊन जागा ताब्यात घेण्यात आली आहे.

या घर मालकांनी तिथे नवीन कंपाऊंडवॉल सुध्दा टाकली आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांची जुनी कंपाऊंड वॉल अद्यापही तोडण्यात आली नव्हती. आता मनपातर्फे या जून्या भिंती तोडण्याची कारवाई सुरु झाली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement