Published On : Sat, Jun 26th, 2021

शुक्रवारी ६ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. २५ जून) रोजी ६ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३६,००० चा दंड वसूल केला.

पथकाने ५९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.