Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Sat, Jan 30th, 2021

    राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त मनपा तर्फे अभिवादन

    नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी व्हेरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले. तसेच हुतात्मा स्मारक सुभाष रोड, बालोदयान येथे नगरीतर्फे पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यात आले. तसेच चितार ओळी, जुनी शुक्रवारी, सतरंजीपूरा, गंजीपेठ, सदर चौक स्थित गांधीजींच्या प्रतिमेला महापौर यांनी पुष्पहार अर्पण केले.

    यावेळी नगरसेवक श्री. संजय बंगाले, सुनिल हिरणवार, प्रमोद चिखले, नगरसेविका श्रीमती उज्वला शर्मा, रुपा राय, श्रीमती हर्षला साबळे आदी उपस्थित होते.

    ३० जानेवारी हुतात्मा दिन म.न.पा.तर्फे श्रध्दांजली
    देशाच्या स्वातंत्रयासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्माच्या स्मरणार्थ शनिवार (३० जानेवारी) रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून नागपूर महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हुतात्मा दिन पाळण्यात आला.

    याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापौर श्री. दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी गांधींजींच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.

    यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रविन्द्र भेलावे, सहा.आयुक्त श्री. महेश धामेचा, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र उचके, अतिरिक्त सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. ‍विजय जोशी, अधीक्षक (सा.प्र.वि.) मदन सुभेदार आदी उपस्थित होते.

    बॅरि. शेषराव वानखेडे पुण्यतिथी निमित्त म.न.पा. तर्फे विनम्र अभिवादन
    नागपूर नगरीचे प्रथम महापौर व माजी मंत्री बॅरि. शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उद्यान स्थित प्रतिमेला महापौर श्री.दयाशंकर तिवारी, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

    याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. रविन्द्र भेलावे, सहा.आयुक्त श्री. महेश धामेचा, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र उचके, अतिरिक्त सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. ‍विजय जोशी, अधीक्षक (सा.प्र.वि.) मदन सुभेदार आदी उपस्थित होते.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145