Advertisement
नागपूर : महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्रीमती जयश्री हिवसे यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
यावेळी उपायुक्त पराग सोमण, एस.बी. घाटे, श्रीकांत फडके, नगरपालिका सहाय्यक संचालक सुधीर शंभरकर, लेखा विभागाचे सहाय्यक संचालक कमलकिशोर राठी, तहसीलदार श्रीराम मुंदडा, संपत खलाटे, श्रीमती माधुरी टेकाडे, नायब तहसीलदार श्रीमती सुजाता गावंडे, नाझर प्रमोद जोंधुळकर तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.