Published On : Wed, Aug 22nd, 2018

केरळ आपदग्रस्तांसाठीच्या मदत साहित्याच्या ट्रकला मुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी

Advertisement

मुंबई: जैन इंटरनॅशनल संघटनेच्यावतीने केरळ येथील आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू व साहित्य असलेले पाच ट्रक येथून रवाना झाले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखविली. या मदत साहित्यात केरळवासीयांसाठी बेडशीट, भांडी, औषधे, टॉवेल, पांघरून आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यावेळी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, केरळच्या आपदग्रस्तांना मदतीचे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. केरळातील आपदग्रस्तांना मदतीसाठी महाराष्ट्रातील नागरिकांनी पुढे यावे.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येत असून महाराष्ट्रातील वैद्यकीय पथक केरळात काम करीत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मदतीचे काम सुरू आहे. केरळच्या मुख्य सचिवांनी या पथकाची प्रशंसा केली आहे. संकटसमयी केरळवासीयांना मदत करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश दिला. या कार्यक्रमावेळी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे संस्थापक नयपद्मसागरजी महाराज, अक्षय पद्मसागरजी महाराज, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राज पुरोहित यांच्यासह जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Advertisement