Published On : Wed, Apr 4th, 2018

महानत्यागी बाबा जुमदेवजी जंयती उत्सव थाटात साजरी

कन्हान: महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ९७ व्या जयंती निमीत्य कन्हान ला विविध कार्यक्रमाने जंयती उत्सव थाटात साजरा करण्यात आला. परमपुज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकी नागपुर व बाबा हनुमान सेवक संस्था कन्हान च्या वतीने सोमवार दि.२ /०४ /२०१८ला सकाळी ८.०० वाजता बाबा हनुमानजी सेवक संस्था भवन येथुन स्वच्छता रैली काढुन गांधी चैक, नगरपरिषद व कन्हान च्या मुख्य मार्गाची स्वच्छता करण्यात आली . मंगळवार (दि.३)ला सकाळी बाबा जुमदेवजी याच्या जंयती निमित्त सकाळी शोभायात्रा काढण्यात आली .

याप्रसंगी शोभायात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले. शोभायात्रा मधे बाबा जुमदेवजी यांची भव्यदिव्य झांकी , दांडीया नृत्य, लेझिम, जय हनुमान व सेवक, सेविका जयघोष करित भ्रमण करून प्रभाग क्रं३ पिपरी, आंबेडकर चौक, गांधी चौक व कन्हान च्या मुख्य मार्गानी दुपारी बाबा हनुमानजी सेवक संस्था भवनात शोभायात्रेचे दुपारी समापन करून बांबाचा फोटोचे स्वागत, दिप प्रज्वलन व मान्यवरांचे स्वागत करून चर्चा बैठक सभेला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरूषोत्तम बावनकर, प्रमुख अतिथी वासुदेवजी बिसने, शिवसेना जिल्हा प्रमुख मा. प्रकाशभाऊ जाधव यांच्या हस्ते चर्चा बैठकीचे उद्घाटन करण्यात आले ..याप्रंसगी पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे ,नगरपरीषद उपाध्यक्ष डॉ.पाठक नगरसेवक अजय लोंढे, युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार , कन्हान पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीरामजी रहाटे, अजयजी त्रिवेदी , कमल यादव, शेलोकर गुरूजी , गजानन चिमुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते .


या मान्यंवराचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला . बाबा जुमदेवजी यांच्या परिवर्तनवादी व सामाजिक सौख्य यावर साहित्य निर्माण करून देशातील संपुर्ण राज्यात बाबाच्या विचारांचा पसार प्रचार झाला पाहिजे तेव्हाच देशात परिवर्तन होऊन प्रगती करता येईल. असे गौरवोद्गार मा प्रकाश जाधव यांनी व्यकत केले . ५ वाजतापासून महाप्रसाद वितरण करण्यात आला . महानत्यागी बाबा जुमदेवजी जंयती उत्सवात कन्हान परिसरातील सेवकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेतला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिका बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान चे कार्याध्यक्ष वासुदेवजी बिसने, माणिक पोटे, मंगलजी शेंडे, शिवसागर विनकने, गडीरामजी मेश्राम, चंद्रभानजी देशमुख, सुधाकर राऊत, मोरेश्वर भोयर , बडु मारबते, बंटी बुदैलिया, दिनेश देशमुख, प्रकाश भोयर, महादेव खडसे, दिलीप पुंड, महेश बिसने, महिलागण बंगाबाई मारबते, शांताबाई भोयर, चंद्रभागा देशमुख, मनिषा राऊत ,टिना बिसने, आशा पोटे, रजनी पराते, मनिषा घुले, गिता बैस, सिंधुबाई विणकणे, जिजा सहारे व समस्त सेवकांनी अथक परिश्रम घेतले .