नागपूर: प्रभाग क्र १३ अंतर्गत येणाऱ्या संजय नगर येथे रस्त्यांचे सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन नगरसेविका डॉ.परिणिता परिणय फुके यांच्या हस्ते विधिवत पूजा करून पार पडले.या वेळी प्रामुख्याने नगरसेवक अमर बागडे उपस्तिथ होते.
मागील अनेक वर्षा पासून संजय नगर येथील काही रस्त्यांचे डांबरीकरण उखडल्यामुळे रस्त्यांच्या मधोमध छोटे मोठे खड्डे पडले आहे.तसेच रस्त्याच्या कडेला गिट्टी जमा झाली आहे,त्यामुळे या मार्गांनी आवगमन करतांना नागरिकांना फार त्रास होत आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांची भेट घेतली व या समस्ये बद्दल अवगत केले व या परिसरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात यावे अशी मागणी केली.नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांनी समस्या ऐकून ती तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.
या परिसरातील समस्या सोडविली म्हंणून नागरिकांनी नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्च देऊन स्वागत केले व आभार मानलेत.
छोटेखानी झालेल्या समारंभात कार्यक्रमाचे उदघाटक नगरसेविका डॉ.परिणिता फुके ह्या होत्या तर अध्यक्ष जेष्ठ नागरिक गजभिये काका हे होते. प्रमुख पाहुणे नगरसेवक अमर बागडे हे होते. या वेळी रेखा ढोके, नितीन भोवते, धीरज बांबोर्डे, कांचन गजभिये,र मा रामटेके, ज्योत्सना गजभिये, वनिता गोरटे, वीणा गाखरे, वैशाली देशमुख, अविनाश गजभिये, अरुण घागरे, विठ्ठल चोपडे, अनुप सेवते, विजय चौरे, सुनीता नाईक, रेखा उमरेडकर, हिरु चौधरी, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
