Published On : Tue, Feb 11th, 2020

राहणीमान सर्वेक्षणाला उत्तम प्रतिसाद

Advertisement

आपले शहर राहण्यासाठी किती उत्तम आहे या मुद्दयावर केंद्र सरकारच्या गृहनिर्माण ‍आणि शहरी विकास मंत्रालयाने देशातील ११४ शहरांमध्ये सर्वेक्षण सुरु केले आहे. नागरिकांना या ऑनलाईन सर्वेक्षणमध्ये महानगरपालिके कडून किती दर्जेदार सोयी – सुविधा मिळतात याच्याबददल माहिती दयावयाची आहे, त्यांचे माहिती वरुन शहराचा दर्जा निश्चित होणार आहे.

देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराला चांगले रस्ते, उत्तम स्वास्थ सुविधा, मेट्रो रेल्वे, स्वच्छता आदि मुद्दयांवर नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. नागरिक आपले मत या ऑनलाईन सर्वे मध्ये नोंदवून आपल्या शहराला प्रथम दर्जा मिळण्यास मदत करु शकतात. नागपूर स्मार्ट सिटीच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.महेश मोरोणे आपल्या चमु सोबत वेग-वेगळया महाविद्यालयात जाऊन विदयार्थ्यांना या सर्वेक्षणाची माहिती देत आहे, विदयार्थ्यांचा याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Gold Rate
09 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,37,000/-
Gold 22 KT ₹ 1,27,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१ ते २९ फेब्रुवारी पर्यंत होणा-या या सर्वेक्षणामध्ये नागरिकांना २४ प्रश्नाचे उत्तर ऑनलाईन दयायचे आहेत. यामध्ये प्रश्न विचारले जात आहे की – शहर राहण्यासाठी किती चांगले आहे, शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्य व्यवस्था, हवेची शुध्दता, शहरात साफ-सफाई, कचरा उचलण्याची प्रक्रिया,पिण्याचे पाणी समाधानकारक मिळते का, पावसाळयात शहर जलमय होते का, शहर किती सुरक्षित आहे, शहरात सुरक्षितता आहे का, आपातकालीन सेवा मिळते का ? महिलांसाठी शहर सुरक्षित आहे का? मनोरंजनाच्या सोयी सुविधा चांगल्या आहेत का, वीज पूरवठा समाधानकारक आहे का, बँक, एटीएम सेवा मिळते काय ? आदी प्रश्न विचारले जातात.

Ease Of living index राहणीमान सर्वेक्षण मधील रँकिंग शहरासाठी महत्वाची आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी राहणीमान सर्वेक्षणाच्या आधारे गुंतवणूक करतात.

आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल स्थानांकन प्राप्त व्हावे, याकरीता नागरिकांनी यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. नागरिकांना पुरविण्यात येणा-या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केंद्र शासनांने निश्चित केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. राहणीमान सर्वेक्षणाव्दारे प्राप्त होणा-या माहितीमुळे प्रशासनास व नागरिकांना देण्यात येणा-या सुविधांबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे शक्य होणार आहे.
महापौर श्री. संदीप जोशी, मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागरिकांना या सर्वेक्षण मध्ये शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या शहराचा दर्जा उंचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

लिंक / क्यूआर कोडव्दारे सहभाग नोंदवा
सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ नागपूर शहरामध्ये राहणा-या प्रत्येक व्यक्तीने राहणीमान सर्वेक्षण २०१९ चा क्यूआर कोड स्कॅन करुन या सर्वेक्षणामध्ये सहभाग घ्यावा. सर्वप्रथम EOL2019.org/citizenfeedback. या संकेतस्थळावर जाऊन सोबतचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर नागपूर शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे, असे डॉ.रामनाथ सोनवणे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट आणी सस्टेनेबल सिटी डेव्हल्पमेंट कारपोरेशन लिमिटेड यांनी म्हटले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement