Published On : Mon, Mar 1st, 2021

कोरोना महामारी थांबविण्यासाठी वाडी वासीयांचा उत्तम प्रतिसाद

– आवश्यक दुकान वगळता इतर सर्व व्यवसाय बंद

वाडी – नागपूर जिल्ह्यात कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 2 दिवसाच्या स्वयंघोषीत लॉकडाऊन घोषीत केला होता शनिवार व रविवार जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार वाडीसह ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाणे स्वतःहून नागरीकांनी बंद ठेवले. नागरीकांनी घरातच राहणे पसंत केले.

वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या निर्देशानुसार, नियमाचे उल्लघंन करणाऱ्या नागरिकांता न.प. पथकाद्वारे दंड वसूल करण्यात आला .

न.प. पथकाचे कर्मचारी धनंजय गोतमारे, रमेश कोकाटे, अनुराग पाटील, मनोहर वानखडे, भीमराव जासुतकर, संदीप अधाऊ, भरत ढोके, अशोक जाधव, लक्ष्मण ढोरे, रितेश गजभिये यांनी आपली कामगीरी चोख बजावली. यावेळी वाडी पोलीसांनी सुध्दा आपली कामगीरी उत्तमरितीने पार पाडली.