नागपूर: रेल्वेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे. पश्चिम रेल्वेच्या भरती मंडळाने अप्रेंटिस पदांसाठी भव्य भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी एकूण 2,865 जागा उपलब्ध असून अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
उपलब्ध जागांची विभागणी-
सामान्य प्रवर्ग – 1150 पदे
अनुसूचित जाती (SC) – 433 पदे
अनुसूचित जमाती (ST) – 215 पदे
ओबीसी – 778 पदे
ईडब्ल्यूएस – 289 पदे
पात्रता निकष –
उमेदवारांचे वय 16 ते 24 वर्षे दरम्यान असावे.
आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट – SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, तर दिव्यांगांसाठी 10 वर्षे.
10 वी आणि 12 वी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.
संबंधित शाखेतील आयटीआय प्रमाणपत्र (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) अनिवार्य.
निवड प्रक्रिया-
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. निवड प्रक्रिया 10 वी व 12 वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे.
अर्ज शुल्क-
सामान्य, OBC व EWS उमेदवारांसाठी : ₹100 + ₹41 प्रक्रिया शुल्क
SC/ST उमेदवारांसाठी : फक्त ₹41 प्रक्रिया शुल्क
आवश्यक कागदपत्रे-
पासपोर्ट आकाराचा फोटो
10 वीचे प्रमाणपत्र
आयटीआय प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अर्ज प्रक्रिया-
इच्छुक उमेदवारांनी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहता अर्ज लवकर पूर्ण करणे योग्य ठरेल, अन्यथा तांत्रिक कारणांमुळे अडचणी येऊ शकतात. ही भरती रेल्वेमध्ये करिअर घडवण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू करून आपली संधी नक्की साधावी.