Published On : Mon, Aug 19th, 2019

‘‘महानिर्मिती नाटय स्पर्धा 2019 चे शानदार उद्घाटन’’

नागपुर: महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाटय स्पर्धा 2019 चे उदघाटन महाकवि कलिदास कला मंदिर येथ आज दि. 19/08/2019 रोजी सकाळी 09ः30 वाजता सौर उर्जा व राख चे कार्यकारी संचालक कैलास चिरुटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी आयोजन समिती अध्यक्ष व नाशिक औ.वि.केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, परळी औ.वि.केंद्राचे मुख्य अभियंता नवनाथ शिंदे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे उप मुख्य अभिंयता मोहन आव्हाड, राकेश कमटमकर ,उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, पुरुशोत्तम वारजूरकर ,कर्मचारी राज्य विमा निगम चे उप निदेशक राकेश कुमार उप कामगार आयुक्त दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवला चंद्रकांत जोशी, मानसी मागीकर, मंगेश बनसोड हे परिक्षक म्हणुन लाभले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व नटराज पुजनाने झाली या नाटय महोत्सव उद्घाटक कैलास चिरुटकर यांनी नाटय महोत्सव उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. मनोगत व्यक्त करतांना त्यांनी सर्व वीज केंद्रातील कर्मचा-याच्या नाटय गुणाना वाव मिळुन त्याचा उपयोग विज केंद्राची कामगारी उंचावण्यासाठी होईल असे प्रकर्शाने नमुद केले. सर्व नाटय स्पर्धातील संघांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल मुसळे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांनी या स्पर्धा खेळी-मेळी च्या वातावरणात पार पडाव्यात असे सांगितले तसेच या स्पर्धांच्या मुळे निर्माण होणाऱ्या संघ भावनेतून विज निर्मितीच्या क्षेत्रात प्रगती साधावी हा संदेश दिला.

आयोजन समितिचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री उमाकांत निखारे यांनी सर्वांचे स्वागत करतांना आनंद होत असल्याचे नमुद केले. मुख्य कार्यालयाव्दारे आयोजनाची जबाबदारी दिल्यामुळे मुख्य कार्यालयाचे सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या स्पर्धा ऑगस्ट मध घेतल्यामुळे सर्व संघानां राज्य व नाटय स्पर्धेत भाग घेतील असे सांगितले.तसेच नाषिककर नाटय रसिकांनी याचा आनंद घ्यावा आणि कालीदास कलामंदिर व परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले.

या प्रसंगी परळी औ.वि.केंद्राचे मुख्य अभियंता नवनाथ शिंदे, उप मुख्य अभिंयता मोहन आव्हाड , यानी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे लिना पाटिल व वांसती नाईक यांनी खुमासदार पध्दतीने सुत्र संचलन केले.

या प्रसंगी कल्याण अधिकारी निवृती कोंडावले यांनी आभार प्रदर्शन केले
या स्पर्धेत दररोज दोन नाटकांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील विज निर्मिती केंद्राचे दहा संघ दाखल झाले आहेत.
या नाटय महोत्सवासाठी अधिक्षक अभियंता शशांक चव्हाण, मनोहर तायडे, अभियंता प्रविण काळोखे, वैषाली धोंडगे,रावळ, जयश्री गोरे, सनिल सुळेकर, विक्रांत किंबहुणे, देवडे यानीही परिश्रम घेतले.