Published On : Sat, Jul 13th, 2019

महा मेट्रो : रिच-४ (सिताबर्डी ते प्रजापती नगर) व्हायाडक्टचे ७२ टक्के कार्य पूर्ण

Advertisement

नागपूर: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे लोकार्पण होऊन चार महिन्यापेक्षा जास्ती कालावधी झाला असून याला नागपूरकर चांगला प्रतिसाद देत आहे. हिंगणा मार्गावरील(रिच-३) येथे देखील लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. निर्धारित वेळेत व सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून मेट्रो अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सदर कार्य पूर्ण करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त नागपूर शहराचा अतिशय वाहतूक वर्दळीचा भाग असलेल्या रिच-४ (सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर) अंतर्गत येणाऱ्या सी.ए. रोड वर देखील मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्य गतीने सुरु आहे.

प्रकल्पाचे काम सुरु असतांना त्या भागातून प्रवास करणाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेडस उभारण्यात आले होते. पण अनेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असल्याने त्या भागातील बॅरिकेडस काढण्यात आले आहे. बॅरिकेड हटविण्या सोबतच आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण देखील करण्यात आले आहे. निर्माणाधीन मेट्रो रेल प्रकल्पाच्या कार्यामध्ये पिल्लर उभारणीचे कार्य पूर्णत्वास असून गर्डर लाँचिंगचे कार्य अतिशय वेगाने सुरु आहे, रस्त्याच्या मधोमध व्हायाडक्टचे पूर्णत्वास येत असलेले निर्माण कार्य तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीमुळे हा संपूर्ण परिसर आता मेट्रो कॉरीडोअर चे रुप घेत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.

रिच-४ अंतर्गत आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :
पाईल्स १२८४ पैकी १२७०, पाईल कॅप २५० पैकी २४५,पियर २७६ पैकी २१२, पियर कॅप २५९ पैकी १९७,पियर आर्म ४५ पैकी ४१,ट्रक आर्म ४४ पैकी २०,सेग्मेंट इरेव्क्शन २३९२ पैकी १७५६, सेग्मेंट कास्टिंग २३९२ पैकी २०८०, स्पॅन इरेव्क्शन २५९ पैकी १६५ झाले असून गर्डर लाँचिंग चे कार्य प्रगतीपथावर आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ७.६५ किमीच्या या मार्गावर एकूण ०८ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे.

नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे.

नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.