Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 1st, 2020

  २३ नोव्‍हेंबरपासून महापौरांकडे दाखल झालेल्या विविध सूचना व तक्रारींचा आलेख

  नागपूर : महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर यांनी शहरातील विविध समस्या आणि त्यावर नागरिकांच्या सूचना मागविण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी शहरातील विविध उद्यानांमध्ये जाउन ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद साधला. आपल्या शहरातील विकासासाठी काय उपाययोजना करता येउ शकतील यासाठी शहरात विविध ठिकाणी १०० ‘सूचना व तक्रार पेट्या’ लावून त्या माध्यमातून सूचना व तक्रारी मागविल्या.

  ‘तक्रार निवारण शिबीर’च्या माध्यमातून झोननिहाय तक्रारींचे निराकरण करण्यात आले. याशिवाय शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता विविध स्वयंसेवी संस्थांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्याकरीता ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळांशीदेखील संपर्क साधून त्यांच्याकडून विविध सूचना आमंत्रित करण्यात आल्या होत्या.

  विविध माध्यमातून माझ्याकडे दाखल झालेल्या शेकडो सूचना आणि तक्रारींचा आलेख.

  ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’
  महापौरपद ग्रहण केल्यानंतर २४ नोव्हेंबरपासून ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमाद्वारे शहरातील विविध उद्यानांमध्ये जाउन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या सूचना आणि तक्रारी जाणून घेतल्या. २४ नोव्हेंबरपासून १० उद्यानांमध्ये भेट दिली. ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ अंतर्गत प्रत्येक उद्यानामध्ये सुमारे ३०० ते ४०० नागरिक उपस्थित होते. प्रत्येक उद्यानामध्येच नागरिकांनी महापौरांपुढे समस्यांचा पाढा वाचला. मोकाट कुत्रे, मोकाट जनावरे, कचरा, अतिक्रमण, रस्त्यावरील खोदकाम, उद्यानांमधील असुविधा, प्रसाधनगृहांमधील अस्वच्छता, ग्रीन जिम, गडर लाईनची समस्या अशा विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. यामध्ये सर्वाधिक २५ तक्रारी कच-याच्या समस्येबाबत होत्या.

  याशिवाय मोकाट कुत्रे व जनावरांच्या समस्येंबाबत १७, ड्रेनेज, सिवर लाईन चोकअपबाबतच्या १५, अतिक्रमणामुळे होणा-या त्रासाबाबत ६, कामातील दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक सहन कराव्या लागणा-या त्रासाबाबत ३, पार्कींगच्या समस्येबाबत ३, उद्यानामध्ये वॉकींग ट्रॅकची आवश्यकता तसेच दुरूस्तीबाबत १, रहदारीच्या समस्येबाबत १, महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र ग्रीन जिमची व्यवस्था करण्याबाबत १, कच-याचे वर्गीकरण करण्याबाबत २ व उद्यानात इतर आवश्यक साहित्याच्या मागणीबाबत १, वाहतुकीचा होणारा खोळंबा लक्षात घेता सिग्नलची व्यवस्था करण्याबाबत १, अतिक्रमणाच्या विळख्यात असलेले फुटपाथ मोकळे करण्याबाबत २, कच-याचे डम्पिंग यार्ड हटविण्याबाबत २, विविध चौकात असणा-या भिक्षेकरू लोकांमुळे होणा-या त्रासाबाबत १, उद्यान सौंदर्यीकरणाबाबत १, उद्यानातील प्रसाधनगृहाची दुरूस्ती व नवीन प्रसाधनगृहाची निर्मिती करण्याबाबत ३, विद्युत दिव्यांच्या व्यवस्थेबाबत १, वाकलेले धोकादायक विद्युत खांब हटविण्याबाबत ४, अधिका-यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना होणा-या त्रासाबाबत २, डासांच्या हौदासामुळे परिसरात फवारणी करण्याबाबत १, पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये होणारी दिरंगाई, अनियमीतता व अत्यंत कमी प्रवाह याबाबत ७, रस्त्यावर थुंकणा-यांसंदर्भात १, तलावांच्या स्वच्छतेबाबत १, सामाजिक तत्वांमुळे होणा-या त्रासाबाबत ४, हुक्कापार्लरवर कारवाई करण्याबाबत १, नाले सफाईसंदर्भात २, रस्ता, उद्यान व इतर ठिकाणी साचणा-या पाण्याच्या समस्येबाबत ५, आठवडी बाजार दुसरीकडे स्थानांतरीत करण्याबाबत १, रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत १, बियरबारमुळे वाढणारा त्रास लक्षात घेता बियरबार कारवाई करण्याबाबत १, सीमेंट रस्त्याच्या कामामुळे होणा-या त्रासाबाबत १ व याशिवाय अन्य अशा सरासरी दोनशेच्यावर तक्रारी मांडण्यात आल्या.

  यावेळी नागरिकांद्वारे विविध सूचनाही मांडण्यात आल्या. मनपातर्फे कचरा संकलीत करण्यात येतो. मात्र अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात येत असल्याने प्रदुषण होते. त्यामुळे कचरा जाळण्यात येउ नये यासाठी कचरा जाळणा-यांवर कारवाई करणे. उपद्रव शोध पथकाद्वारे उपद्रवींवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. शहराला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे. मात्र याबाबत लोकांच्या मनात भिती निर्माण होउन ते कोणतेही उपद्रव करणार नाहीत, यादृष्टीने दंडाची रक्कम वाढविणे. शहराच्या इतिहासात यंदा पहिल्यां नागपूरात भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ ही काळाची गरज आहे. त्यामुळे शहरात मोठ्या इमारतींमध्ये ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ सिस्टीम बंधनकारक करणे. उद्यानांमध्ये येणा-या नागरिकांच्या वाहनांच्या पार्कींगसाठी जागा नसल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे उद्यानापुढे पार्कींगची व्यवस्था करण्यात यावी. खासगी बसेसमुळे बस स्थानक, गणेशपेठ भागासह शहरातील इतरही भागात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. इतर शहरांच्या धर्तीवर नागपुरातील खासगी बसेसही शहराबाहेर थांबविण्यात याव्यात, अशा अनेक सूचनाही ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’मध्ये नागरिकांनी मांडल्या.

  ‘सूचना व तक्रार पेट्या’
  शहरातील नागरिकांच्या तक्रार व त्यांच्या सूचना आमंत्रित करण्यासाठी शहरातील १०० ठिकाणी ‘सूचना व तक्रार पेट्या’ लावण्यात आल्या होत्या. मनपा मुख्यालय, महापौर कक्ष यासह सर्व झोन कार्यालय, विविध उद्यान, शासकीय कार्यालय तसेच अन्य ठिकाणी १०० ‘सूचना व तक्रारी पेट्या’ लावण्यात आल्या. यामध्ये २७६ तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रार पेटीमधून सर्वाधिक २५ तक्रारी अतिक्रमण संदर्भात प्राप्त झाल्या. याशिवाय सफाई कामगार व्यवस्थित येत नसल्याबाबत २१, मोकाट कुत्रे व जनावरांचा होणारा त्रास यासंदर्भात १०, स्वच्छता गृह नसल्याबाबत ९, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांमुळे होणारा त्रास याबाबत ८, खड्ड्यांसंदर्भात ५, चेंबर ब्लॉकची समस्या असलेल्या २, विद्युत खांबांची आवश्यकता असणा-या २, आर.एल.बाबत ३, सिवर लाईनच्या समस्येबाबत १, कर संबंधी १, सीसीटीव्ही कॅमे-याची आवश्यकतेबाबत १, पार्कींगच्या समस्येबाबत २, कौटुंबिक तक्रार १, पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये मांडल्यानंतर निवारण न झालेली तक्रार १, अवैध व्यवसायामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत १, प्ले स्कूलची आवश्यकता दर्शविणारी १, स्पीड ब्रेकरबाबत २, ध्वनी प्रदूषणामुळे होणारा त्रास याबाबत २, रस्त्यावर कच-याच्या समस्येबाबत २, डम्पिंग यार्ड हटविण्याबाबत १, बेचेंसबाबत १, पाण्याच्या नळासंदर्भात २, दारू दुकान हटविण्याविषयी १, सिग्नलबाबत १, सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याबाबत १, रिकाम्या भूखंडावरील उपद्रवामुळे नागरिकांना होणारा त्रास यासंदर्भात १, उद्यानामध्ये रनींग ट्रॅकची मागणी करणारी १, भूमिगत इलेक्ट्रिक वायरिंग करण्याबाबत १ आणि कचरा पेट्यांच्या मागणीबाबत ३ आणि इतर अशा विविध तिनशेच्या वर तक्रारी ‘सूचना व तक्रारी पेट्या’मधून प्राप्त झाल्या.

  तक्रार निवारण शिबीर

  नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये तक्रारी नोंदविण्यात आल्या. यानंतर या सर्व तक्रारींवर सुनावणी करून त्या तक्रारीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत महापौर कक्षामध्ये ‘झोननिहाय तक्रार निवारण शिबीर’ घेण्यात आले होते. तक्रार निवारण शिबीरामध्ये झोननिहाय ४६२ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. याशिवाय वेळेवर २०० ते २५० नागरिक आपल्या समस्या घेउन पोहोचले होते. सकाळी १० ते रात्री ८ वाजतापर्यंत या सर्व तक्रारी जाणून घेत संबंधित प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. निर्धारित कालावधीमध्ये तक्रारी न सुटल्यास त्याबाबत पाठपुरावाही करण्यात येणार आहे.

  मागील एक महिन्यात प्रामुख्याने घेतलेले निर्णय

  · खासगी बसेस शहराबाहेर – या करिता तात्काळ ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात समिती गठीत करून तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश

  · शहरातील वाढते अतिक्रमण – स्थायी निर्णय घेण्याकरीता ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत. समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर

  · महापौर सहायता निधी – ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले यांच्या अध्यक्षतेखाली समिती – समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर

  · मोकळ्या भुखंडावर कचरा – मोकळ्या भुखंडावरील कचरा साफ न केल्यास भूखंड ताब्यात घेण्याकरीता सुचना फलक लावण्याची कायदेशीर प्रक्रिया प्रारंभ

  · शहरातील सर्व पेट्रोलपंपांची स्वच्छतागृहे १ जानेवारी २०२० पासून जनतेकरीता खुली

  · शहरातील सर्व मुता-यांच्या स्वच्छतेची जबाबदारी मनपाच्या कर्मचा-यांची राहिल

  · महापौर निधी केवळ शहरातील सुलभ शौचालयाच्या निर्माणाकरीता, ‘टी’ शौचालये निर्माण करण्याचे आदेश

  · मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी करीता नवीन दर निश्चीत करून शहरातील व शहराबाहेरील अनेक स्वयंसेवी संस्थांना आमंत्रण

  · मध्यंतरी काही कारणामुळे बंद पडलेला ‘नागपूर गौरव सोहळा’ या वर्षापासून पुन्हा प्रारंभ

  · मागील ४ वर्षापासून प्रलंबित असलेला ‘खाउ गल्ली’चा प्रश्न सुटला. ९ जानेवारी २०२० पासून जनतेच्या सेवेत

  येणा-या काळात नागपूर महानगरपालिका नागरिकांना दर्जेदार सुविधा प्रदान करण्याबाबत कटीबद्ध असून एक जबाबदार महानगरपालिका कशी राहिल यासाठी प्रयत्न करणार.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145