नागपूर : शहरातील क्रीडाक्षेत्राला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सव सीझन-4 यंदा अधिक भव्य स्वरूपात पार पडणार आहे. 31 मे ते 7 जून 2026 या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धांमध्ये तब्बल 23 हजार 800 खेळाडू सहभाग घेणार असून 18 विविध क्रीडा प्रकारांमध्ये सामने रंगणार आहेत. विजेत्या स्पर्धकांसाठी 57 लाख रुपयांच्या बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या पुढाकारातून आणि माजी आमदार Sandeep Joshi यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. “खेळो नागपूर खेलो” या घोषवाक्याखाली शहरातील 20 ठिकाणी विविध स्पर्धा पार पडणार आहेत. युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे आणि स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
31 मे रोजी यशवंत स्टेडियम येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. उद्घाटनानिमित्त “रन नागपूर रन” मॅरेथॉनचे आयोजनही करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे.
यंदाच्या स्पर्धांमध्ये योगासन, खो-खो, अॅथलेटिक्स, कॅरम, रोलर स्केटिंग, बेंच प्रेस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, हँडबॉल, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक, कुस्ती, कबड्डी आणि जलतरण यांसारख्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वरिष्ठ गटांपर्यंत सर्व खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





