नागपूर : घराघरांमध्ये शिवजयंतीचा जागर व्हावा, जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदीप्यमान पराक्रमाची महती व थोरवी नवीन पिढीपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने पंजाब नॅशनल बँक कर्मचारी सेना नागपूरतर्फे सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता पंजाब नॅशनल बॅक, सर्कल ऑफिस कॅम्पस किंग्सवे, नागपूर येथे भव्य शिव जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात मंडळ प्रमुख डीजीएम आशिष चतुर्वेदी हे मुख्य अतिथी तर मुख्य वक्ता व प्रमुख अतिथी म्हणून माजी प्र-कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. राजेश गादेवार, उपमंडल प्रमुख हरीष वासनकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.
अधिक संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन वर्कमॅन विंगचे अध्यक्ष धर्मेश पाटील, ऑफिसर विंगचे अध्यक्ष संदीप वहाडे, वर्कमनैन विंगचे सचिव रमेश बाजीराव, ऑफिसर विंग सचिव संजय निखारे यांनी केले आहे.