Published On : Mon, Mar 13th, 2023

चार चौघी उद्योजिका प्रदर्शनी ला महिलांचा भव्य प्रतिसाद 

Advertisement

 

 

नागपूर: चार चौघी ग्रुप द्वारे नुकत्याच नक्षत्र सभागृह, प्रताप नगर येथे आयोजित महिला दिन आणि गुढी पाडवा स्पेशल “चार चौघी उद्योजिका प्रदर्शनी” ला पश्चिम आणि दक्षिण -पश्चिम नागपुरातील महिला आणि युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध कलाकार नेहा मुंजे ह्यांनी ह्या प्रदर्शनी चे उदघाटन केले होते.

प्राजक्ता चोळकर , आसावरी क्षिरसागर , सीमा खडसे आणि रश्मी रुपदे (चार चौघी)  आयोजित ह्या प्रदर्शनी मध्ये  महिला उद्योजिका आणि महिला बचत गट ह्यांची ४५ स्टॉल ने भाग घेतला आणि आपली विविध उत्पादने सादर केली.