Published On : Sat, Jun 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

भंडारा येथे सर्पमित्र चैताली भस्मे यांचा भव्य सत्कार

"सन्मान द्या व सन्मान घ्या" सामाजिक उपक्रमांतर्गत गौरव; मानाचा फेटा, शाल व पुरस्काराने सन्मान
Advertisement

भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भंडारा जिल्ह्यातील पहेला येथे “सन्मान द्या व सन्मान घ्या” या सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Gold Rate
June 19 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,600 /-
Gold 22 KT ₹ 1,34,200 /-
Silver/Kg ₹ 2,29,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या सोहळ्यास नागपूरच्या अभिनेत्री, सर्पमित्र, प्राणीमित्र, वन्यजीव रक्षक तसेच मांगल्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. चैताली भस्मे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. वन्यजीव संरक्षण, सर्पमित्र म्हणून केलेले कार्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांचा मानाचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Advertisement

भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या हस्ते चैताली भस्मे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पत्रकार गोकुळसिंग राजपूत, संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभूळकर, माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी तसेच अभिनेते अश्विनकुमार वघाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी चैताली भस्मे यांच्या वन्यजीव संवर्धन, सर्पमित्र कार्य आणि सामाजिक योगदानाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
5 मिनट की चूक... 4.50 लाख पर चोरों का झपट्टा! #nagpurnews #crime #loot #maharashtranews

5 मिनट की चूक... 4.50 लाख पर चोरों का झपट्टा! #nagpurnews #crime...

प्रेम का झांसा, ब्लैकमेलिंग और वसूली का खेल! #nagpurnews #crime #latestnews #maharashtranews

प्रेम का झांसा, ब्लैकमेलिंग और वसूली का खेल! #nagpurnews #crime #latestnews #maharashtranews

खाकी का रौब, ठगी का खेल! फर्जी पुलिस का किया पर्दाफाश #nagpurnews #crime #fakeofficer #latestnews

खाकी का रौब, ठगी का खेल! फर्जी पुलिस का किया पर्दाफाश #nagpurnews...

मध्य प्रदेश से नागपुर तक गांजे की डिलीवरी! #nagpurnews #crime #md #taskar #madhyapradesh

मध्य प्रदेश से नागपुर तक गांजे की डिलीवरी! #nagpurnews #crime #md #taskar...

फर्जी दस्तावेजों के दम पर 15 लाख की ठगी.. #nagpurnews #crime #goldloan #latestnews #fraud

फर्जी दस्तावेजों के दम पर 15 लाख की ठगी.. #nagpurnews #crime #goldloan...

सुसाइड नोट में लिखा "सॉरी मां, मुझसे नहीं हो पाया" #nagpurnews #suciedad #news

सुसाइड नोट में लिखा "सॉरी मां, मुझसे नहीं हो पाया" #nagpurnews #suciedad...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges