नागपूर: आकर्षक रांगोळी, मन प्रसन्न करणारी आरास आणि मंत्रोच्चाराच्या स्वरांनी महाल येथील कल्याणेश्वर मंदिर परिसर उजळून गेला, केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय, आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या निर्देशानुसार, नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अटूट आस्था की गौरव गाथा’ या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा भव्य संगम सोमवारी (ता.११) सकाळी नागपूरकरांनी अनुभवला. यावेळी मातृशक्ती द्वारा भगवान शिव चे रुद्राभिषेक करण्यात आले.
महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लिला हातीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थित सोमनाथ स्वाभिमान पर्व चा भव्य प्रारंभ झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटनेत्या श्रीमती आभा बिज्जू पांडे शिवसेना गट नेते श्री. गणेश चार्लेवार, गांधीबाग झोनच्या सभापती श्रीमती उमा देशमुख, नगरसेवक श्री सुधीर राऊत, महिला व बाल कल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, अग्निशमन विशेष समिती सभापती श्रीमती रुपाली ठाकूर, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शना धवड, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा, नगरसेवक श्री. सचिन नाईक, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे नगरसेवक श्री. विजय होले, नगरसेवक श्री. रामभाऊ आंबुलकर, नगरसेवक श्री. मनोज साबळे, नगरसेविका श्रीमती साधना बरडे, नगरसेवक श्री सुनील हिरणवार, नगरसेवक श्री. लखन येरवार, नगरसेवक श्री. विनोद कन्हेरे, नगरसेवक श्री. विनोद बघेल, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह मनपाचे उपायुक्त श्री. मंगेश खवले आणि क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वाच्या उपस्थितीत कल्याणेश्वर मंदिर भव्य पूजा करण्यात आली.
सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वानिमित्त कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय गीत-भजन, ११ हजार ‘ॐ नमः शिवाय’ जप तसेच रुद्र अभिषेक करण्यात आला. यावेळी महिलांनी पौरोहित्य केले. तसेच देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील सोरटी सोमनाथ येथे केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करतांना महापौर श्रीमती निता ठाकरे म्हणाल्या की, भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशामध्ये सोमनाथ मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परकीय आक्रांतांनी देशाच्या धार्मिक संस्कृतीवर आघात केल्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोमनाथ मंदिर, स्वातंत्र्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुळे झाले. त्याघटनेला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज शहरातील प्राचीन आणि भक्तांच्या भक्तिभावाचे श्रद्धेचे स्थान असणाऱ्या महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात हे पावन पर्व साजरे करण्यात आल्याचा मला आनंद आहे. देशाची विश्वगुरू होण्याकडे वाटचाल ही सनातनाशिवाय पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगत महापौरांनी समाजाला चांगली दिशा देण्याचे महिलांमध्ये निसर्गतःच गुण असतात, अशी एक चांगली दिशा आजच्या कार्यक्रमात महिलांनी केलेल्या पौरोहित्याचे मध्यातून दर्शविली असल्याचेही सांगितले.
तर माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी संपूर्ण देशात सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरे होत असल्याचे सांगत यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कल्याणेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे, यामुळे नागपूरच्या प्राचीन मंदिराला नवीन वैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना सांगितले. देशाचा इतिहास जिवंत राखण्यासाठी आणि त्याची माहिती नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनीष सोनी यांनी केले, तर आभार श्रीमती सारिका नांदुरकर यांनी मानले.
भजनाने झाले वातावरण भक्तिमय
सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वानिमित्त कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय गीत-भजन सादर करण्यात आले. यावेळी श्री गुरु भजन मंडळ, उत्साही भजन मंडळ रुक्मिणी भजन मंडळ, आदिशक्ती भजन मंडळ, माऊली भजन मंडळ, विठ्ठल रुख्मिणी भजन मंडळ यांनी भक्तिमय भजन सादर केले.










