Published On : Sat, Feb 20th, 2021

ग्रामीण पत्रकार संघ रामटेक तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी!

रामटेक – ग्रामीण पत्रकार संघ रामटेक व डाटा टेक कम्प्युटर यांच्या वतीने राजे छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छ्त्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेला माल्यारपण करून शिवरायांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामीण पत्रकार संघ रामटेक च्या नागपुर जिल्हा कार्यकारणी अध्यक्षा सुषमा मर्जीवे तसेच ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा शीतल चिंचोळकर तसेच सदस्य रुपाली तांडेकर, प्रज्ञा कावळे , ऋतुजा कोल्हे , व डाटा टेक कम्प्युटर च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.