Published On : Mon, Mar 9th, 2020

ग्रामीण पत्रकार संघा तर्फे जागतिक महिला दिना निमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार

Advertisement

रामटेक : महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ग्रामीण पत्रकार संघातर्फे आज महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे नागपूर जिल्हा कार्यकारी अध्यक्षा सुषमा मर्जिवे, जिल्हा उपाध्यक्ष शितल चिंचोळकर , सदस्य आचल वासनिक, मेंघरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा शाल ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दिवाणी न्यायालय रामटेक येथे दिवाणी न्यायाधीश व्हि.पि. धूर्वे यांचा ग्रामीण पत्रकार संघातर्फे सत्कार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच न्यायलयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ छाया ठाकरे, सहाय्यक अधिक्षक अंजली जोशी, अभिलाषा यादव, शिपाही राणी धुळे यांचे देखील पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि प्रत्येक महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत असून महिलांनी निरंतर खूप प्रगती करावं आणि मुलगा असो वा मुलगी दोघांनाही समान हक्क देण्याची मानसिकता निर्माण व्हावी असे दिवाणी न्यायाधीश व्हि. पी . धूर्वे यांनी आपले मत व्यक्त केले व जागतिक महिला दिनाच्या शुभेछा दिल्या.

विविध क्षेत्रासह पत्रकार क्षेत्रात देखिल महिला अग्रेसर असुन पत्रकार क्षेत्रात आपल्या लेखनीने ग्रामीणच्या बातम्यांना विशेष प्राथमिकता देऊन स्वताच्या कलेचा एक प्रकारे परिचय देत असलेल्या ग्रामीण पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा कार्यकारी अध्यक्षा सुषमा मर्जिवे, आणि जिल्हा उपाध्यक्ष शितल चिंचोलकर यांचा देखिल गौरव दिवाणी न्यायाधीश व्हि.पी. धूर्वे यांनी केला .

महिला आज पत्रकार क्षेत्रात कार्यरत असल्याचं त्यांना अभिमान वाटतो. एका छोट्याशा गावातून एक पत्रकार बनन म्हणजे सोप नसत . घरची परिस्थिती कशीही असो आपण जर मनातून निश्चय केला तर आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो असे मत दिवाणी न्यायाधीश व्हि.पी. धूर्वे यांनी व्यक्त केले. पोलिस स्टेशन रामटेक येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक नयन अलुरकर यांचा ग्रामीण पत्रकार संघातर्फे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्त्री ही सुपर वुमन बनली पाहिजे, ती सक्षम बनली पाहिजे, तसेच स्त्रियांच्या प्रगती साठी घरापासून तर समाजापर्यंत सर्वांनीच तिला सहकार्य केले पाहिजे असे मत पोलीस सहाय्यक निरीक्षक नयन आलुलकर यांनी व्यक्त केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जी. भुते आणि पोलीस उप निरीक्षक मीना बारंगे ,सहपोलीस उपनिरीक्षक सीमा बेंद्रे , समाज सेविका ज्योती कोल्हेपरा व भगिनिंचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नगर परिषद रामटेक येथे ग्रामीण पत्रकार संघातर्फे नगरपरिषद च्या उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे , बांधकाम सभापती रत्नमाला अहीरकर, शिक्षण सभापती कविता मुलमुले, नगरसेविका चित्रा धुरई, लता कामडे, पद्मा ठेंगरे, उज्वला धमगाये, वनमाला चौरागडे यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला करण्यात आला. राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेकच्या प्राचार्य कमल लिखार मॅडम यांचे ग्रामीण पत्रकार संघ तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री नरेंद्र तिडके महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .संगीता टक्कामोरे , प्रा पटेल मॅडम, पारवे मॅडम, यांचा सुद्धा ग्रामीण पत्रकार संघाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जागतिक महिला दिनी ग्रामीण पत्रकार संघाच्या स्तुत्य उपक्रमाची दिवानी न्यायाधिश व्हि.पी. धूर्वे , सहायक पुलिस अधिक्षक नयन आलूरकर , नगरसेविका , डॉ. संगिता टक्कामोरे ,यानी स्तुती केलीं.