Published On : Mon, Mar 9th, 2020

आजनी येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी येथे ईश्वर पटले स्मृती प्रित्यर्थ ईश्वर स्पोर्टीग क्लब आजनी तर्फे आयोजित अंडर आर्म नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस कमेटी महासचिव सुरेशभाऊ भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कृ. उ. बाजार समिती कामठीचे सभापती हुकुमचंदजी आमधरे, जि. प. सदस्य अवंतिकाताई लेकुरवाळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक काशीनाथ प्रधान, पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, मेघराजजी गिऱ्हे, सरपंच सुनील मेश्राम, कमलाकरजी मोहोड, आजनी येथील ग्रामपंचायत सदस्य गण, ,बेनिराम वीघे, सुरेश वीघे, भैयालाल चमेले, गजानन गोमकार, प्रवीण कुथे, दिवाकर वानखेडे, मालाताई इंगोले, नारायण पारेकर, प्रशांत माहूरे, प्रशांत काळे, खुशालजी वीघे, मोतीराम इंगोले, संजय जीवतोडे, विजय घोगरे, नितेश मनगटे, महेंद्र मिरासे, आशिष रडके, प्रवीण येलेकार, श्रीकांत गिऱ्हे, अनुराग रडके आदींची विशेष उपस्थिती होती.

सराव सामना शिरपूर येथील चमू व ईश्वर स्पोर्टीग क्लब दरम्यान झाला. संचालन लीलाधर दवंडे यांनी केले तर, आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रफुल्ल रडके, अरविंद येलेकार, रितेश हरणे, राहुल महल्ले, गुणवंता राऊत, नितीन ढोले, पंकज भोयर, शंकर भोयर, अनिल वीघे, सचिन ढोले, रोहित जीवतोडे,आकाश देवतळे,अमोल कडू, रितेश उकेबोंद्रे, सौरभ घुले, प्रणय वाघ, अतुल वीघे, निखिल लायबर, शिवाजी वानखेडे, बंटी नारनवरे, अविनाश मेश्राम, आशिष गीऱ्हे, शुभम घोडे, भास्कर वीघे, अनिकेत इंगोले, स्वप्नील बावणे, विक्की वाणी, रोहित बानेवार, चेतन वैद्य आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

संदीप कांबळे कामठी